Home » Blog » ओव्हनमध्येही सूक्ष्मजीवांचे अस्तित्व

ओव्हनमध्येही सूक्ष्मजीवांचे अस्तित्व

वापरण्यासाठी सोपे व सुरक्षित वाटणाऱ्या या ओव्हनमुळे नवी समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

by प्रतिनिधी
0 comments

लंडन

बदलत्या काळामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर वाढला आहे. घरातील स्वयंपाकगृहांबरोबरच कार्यालयांमधील कॅन्टीनमध्येही ओव्हन सर्रास दिसतात. वापरण्यासाठी सोपे व सुरक्षित वाटणाऱ्या या ओव्हनमुळे नवी समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे, संशोधकांना मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये १००पेक्षा जास्त प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आढळून आले आहे.

सूक्ष्मजीवशास्त्रातील शास्त्रज्ञांनी प्रथमच ओव्हनमध्ये राहणाऱ्या सूक्ष्मजीवांविषयी अभ्यास केला आहे. या संशोधनाचा अहवाल ‘फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी’ या नियताकालिकामध्ये सात ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मॅन्युएल पोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आतील भागाची निरीक्षणे नोंदवली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आढळून आले. यातील काही सूक्ष्मजीव अन्नाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरणारेही आहेत, असे समोर आले आहे. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये उच्च तापमान असते. तसेच, विद्युत-चुंबकीय प्रारणेही असतात. या परिस्थितीमध्येही या सूक्ष्मजीवांनी कसे अनुरूप करून घेतले, हा संशोधकांसमोरील प्रश्न आहे. या पुढील संशोधनामध्ये त्याविषयी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न असेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. पोरकर यांनी नमूद केले आहे की, ‘त्यांना घरगुती मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आढळलेले सूक्ष्मजीव स्वयंपाकघराच्या पृष्ठभागावर आढळणार्या सूक्ष्मजीवांसारखेच होते. त्यातील काही जीवाणू आजारासाठी कारणीभूत ठरू सकतात. त्यामुळे स्वयंपाकघराच्या इतर पृष्ठभागाइतकेच मायक्रोवेव्ह स्वच्छ केले पाहिजे.’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00