Home » Blog » Patakadil loss : ‘जुना बुधवार’ कडून ‘पाटाकडील’ चा सडनडेथ

Patakadil loss : ‘जुना बुधवार’ कडून ‘पाटाकडील’ चा सडनडेथ

अटल चषक फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Patakadil loss

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या  झालेल्या सामन्यात पूर्णवेळेत झालेली बरोबरी, टायब्रेकरमध्ये बरोबरीनंतर संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाचा सडनडेथमध्ये १-० (४-४) असा पराभव करत अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या  उपांत्य फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबर राहिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या स्मरणार्थ भाजप आणि तटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Patakadil loss)

पाटाकडील आणि जुना बुधवार यांच्यातील उपांत्यपूर्व लढतील सामन्यात पाचव्या मिनिटाला जुना बुधवारच्या हर्ष जरगने गोल करत सामन्यात आघाडी घेतली. २४ व्या मिनीटाला पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे-पाटील याने गोलची परतफेड करून मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात  ६१ व्या मिनीटाला जुना बुधवारच्या टी.एम. विष्णूने गोल नोंदवून संघाला पुन्हा २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड ७९ व्या मिनीटाला पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे पाटील गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. ऋषिकेशचा हा दुसरा वैयक्तिक गोल होता. पूर्णवेळेत हीच स्थिती राहिल्याने सामना बरोबरीत राहिल्यानंतर पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. (Patakadil loss)

टायब्रेकरमध्ये  जुना बुधवारच्या तेजस जाधवचा स्ट्रोक पाटाकडीलचा गोलरक्षक राजू मिरीयाला याने रोखला. उत्तरादाखल पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरचा स्ट्रोक जुना बुधवारचा गोलरक्षक शुभम घराळे याने रोखला. यानंतर उर्वरित टायब्रेकरमध्ये जुना बुधवारकडून पृथ्वीराज निकम, रोहित मंडलिक, साहिल खोत व प्रसाद सरनाईक यांनी गोल केले. तर उत्तरादाखल पाटाकडीलच्या अनशिद अली, यश देवणे, निवृत्ती पवनोजी व अरबाज पेंढारी यांनी बिनचूक गोल केले. (Patakadil loss)

सडनडेथ तब्बल ५-५ स्ट्रोकपर्यंत रंगला. जुना बुधवारकडून रिंकू सेठ, संकेत जाधव, प्रेम देसाई, संकेत जरग यांनी केलेल्या गोलची परतफेड जुना बुधवारच्या रोहित पवार, प्रतिक बदामे, ओंकार पाटील, ऋषीकेश मेथे-पाटील यांनी केली. यामुळे सडनडेथही ४-४ असा तुल्यबळ झाला. मात्र पाचव्या स्ट्रोकमध्ये बरोबरीची मालिका खंडीत झाली. जुना बुधवारच्या सचिन मोरे याने गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली. उत्तरादाखल पाटाकडीलच्या संदेश कासारने मारलेला फटका बाहेर गेला. यामुळे सामना जुना बुधवारने सडनडेथवर १-० असा जिंकत उपांत्यफेरीत प्रवेश केला. (Patakadil loss)

बुधवारचा सामना : शिवाजी तरुण मंडळ वि. वेताळमाळ तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.

हेही वाचा :

बुमराह, मानधनाचा सन्मान

सिमरनप्रीत कौरला रौप्य

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00