Home » Blog » Red cross medics killed: रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

Red cross medics killed: रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

by प्रतिनिधी
0 comments
Red cross medics killed

फाह : दक्षिण गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात जखमींची सेवा करण्यासाठी गेलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रेसेंट सोसायटीज (आयएफआरसी) च्या पथकावर गोळीबार करण्यात आला. रुग्णवाहिकेवर झालेल्या या हल्ल्यात आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दक्षिण गाझामधील रफाह येथे ही संतापजनक घटना घडली. याबद्दल आयएफआरसीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Red cross medics killed)

२३ मार्च रोजी अल-हशाशिनमध्ये नऊ जणांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या पथकावर जोरदार गोळीबार झाला. त्यात आठ कर्मचारी ठार झाले. एक कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहे. या ठिकाणी आठवड्यापासून प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर नुकतेच या कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पॅलेस्टाईन रेड क्रेसेंट सोसायटी (पीआरसीएस) ने म्हटले आहे की, गाझामधील हमास-संचालित नागरी संरक्षण संस्थेच्या सहा सदस्यांसह आणि एका संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्याचे मृतदेह सापडले आहेत. (Red cross medics killed)

या पथकावर कोणी गोळीबार केला हे सांगितले नाही – परंतु हमासने हल्ल्यासाठी इस्रायल संरक्षण दलांना जबाबदार धरले.

रविवारी (३० मार्च) दिलेल्या निवेदनात आयएफआरसीने म्हटले आहे की, ” आठ पीआरसीएस कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.  सात दिवसानंतर रफाहच्या ज्या भागात ते शेवटी दिसले होते तेथून हे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. आठवडाभर येथे प्रवेश नाकारण्यात आला होता.”

मृतांमध्ये रुग्णवाहिका अधिकारी मुस्तफा खुफागा, सालेह मुअमर आणि एज्जेदिन शाथ आणि प्रथम प्रतिसाद देणारे स्वयंसेवक मोहम्मद बहलौल, मोहम्मद अल-हेला, अशरफ अबू लब्दा, रैद अल-शरीफ आणि रिफत रदवान यांचा समावेश आहे. (Red cross medics killed)

त्यात असेही म्हटले आहे की रुग्णवाहिका अधिकारी असद अल-नस्सासरा अजूनही बेपत्ता आहेत.

आयएफआरसीचे सरचिटणीस जगन चापागैन म्हणाले, “आम्हाला या घटनेबद्दल तीव्र दुःख वाटत आहे. हे सर्व कर्मचारी सेवेसाठी समर्पित होते. ते जखमींना मदत करत होते. ते मानवतावादी होते,”

“ते वैद्कीय कर्मचारी आहेत, असे स्पष्ट होईल, असा त्यांचा पेहराव होता. तसेच रुग्णवाहिकेवरही वैद्यकीय सेवेचे चिन्ह स्पष्ट होते. त्यांचे संरक्षण करायला हवे होते. अगदी गुंतागुंतीच्या संघर्ष क्षेत्रातही नियम आहेत. नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे; मानवतावादींचे संरक्षण केले पाहिजे.” आरोग्य सेवांचे संरक्षण केले पाहिजे.” (Red cross medics killed)

रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंटच्या विधानावर आयडीएफने सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाही.

एएफपी वृत्तसंस्थेने शनिवारी वृत्त दिले की इस्रायली सैन्याने गेल्या रविवारी दक्षिण गाझामध्ये रुग्णवाहिकांवर गोळीबार केल्याची कबुली दिली. संशयास्पद वाहने म्हणून गोळीबार केल्याचे आता सांगण्यात येत आहे.

हमासचे वरिष्ठ अधिकारी बासेम नैम यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

“आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याअंतर्गत संरक्षित असलेल्या बचाव पथकातील कामगारांची ठरवून केलेली हत्या ही जिनेव्हा करारांचे स्पष्ट उल्लंघन आणि युद्ध गुन्हा आहे,” असे ते म्हणाले.

जानेवारीमध्ये सुरू झालेल्या युद्धबंदीचा पहिला टप्पा संपल्यानंतर आणि कराराच्या दुसऱ्या टप्प्यावरील वाटाघाटी थांबल्यानंतर इस्रायलने १८ मार्च रोजी गाझामध्ये लष्करी आक्रमण पुन्हा सुरू केले.

हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

हेही वाचा :
कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00