Home » Blog » Earthquake hits Myanmar : म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या एक हजारावर

Earthquake hits Myanmar : म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या एक हजारावर

शक्तिशाली भूकंपामुळे म्यानमार, थायलंडमध्ये हाहाकार

by प्रतिनिधी
0 comments
Earquakes in Myanmar

नेपिडो : म्यानमार देशाला शक्तिशाली भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले. शुक्रवारी सकाळी ७.७ रिश्टर स्केलचा धक्का बसला. संपूर्ण म्यानमार या घटनेने हादरून गेले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्ते उखडले. प्रचंड मानवी आणि वित्तहानी झाली. एका लष्करी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेतील मृतांची संख्या एक हजारावर गेली असून दीड हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हे एजन्सीच्या दाव्यानुसार मृतांची संख्या दहा हजारांपर्यंत जाऊ शकते. ढिगा-याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना तसेच मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Earthquake hits Myanmar)
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ११ वाजून ५० मिनिटांनी ७.७ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. हा भूकंप दहा किलोमीटर खोलीवर झाला आहे. भूकंपाच्या या तीव्र धक्क्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. एक निर्माणाधीन इमारत कोसळली. त्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला. ८० वर कामगार अडकले आहेत.(Earthquake hits Myanmar)
मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सांगितले की, नेपिडो, मंडाले आणि सागाइंगमधील रुग्णालये जखमींनी ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आव्हान आरोग्य व्यवस्थेसमोर आहे.
जंटा प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांनी राष्ट्रीय एमआरटीव्हीवरील भाषणात आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे. आम्ही भारताकडून देऊ केलेली मदत स्वीकारण्याचे आम्ही ठरवल्याचे ते म्हणाले.

अनेक जखमी लोक येत आहेत. यापूर्वी असे चित्र कधीही पाहिले नाही. आमच्यासमोर खूप आव्हाने आहेत. खूप थकलो आहोत. तरीही परिस्थिती हाताळत आहोत.

एक डॉक्टर, नेपिडो रुग्णालय

  • आरोग्यसेवा कोलमडली
  • म्यानमारची राजधानी नेपिडो येथील रुग्णालयाबाहेर जखमींच्या रांगा
  • मिळेल त्या वाहनांना जखमी दाखल
  • जखमींचे शरीर धूळ आणि रक्ताने माखलेले
  • रुग्णालयाचीही पडझड; आरोग्यसेवा देण्याचे आव्हान
  • जखमींवर उघड्यावरच उपचार, नातेवाईकांच्या हातात आयव्ही ड्रीप
  • म्यानमारचे लष्कर प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांची रुग्णालयाला भेट


दरम्यान, म्यानमारसह चीन आणि थायलंडमध्येही तीव्र धक्के बसले. थायलंडची राजधानी बँकॉकमधील उंच इमारतींना भूकंपाचा फटका बसल्याचे वृत्त आहे. भूकंपानंतर बँकॉकमध्ये आणीबाणीची घोषणा थायलंडच्या पंतप्रधानांनी केली आहे. (Earthquake hits Myanmar)

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या धक्क्यांमुळे इमारती हादरल्या. बँकॉकमध्ये गगनचुंबी इमारत कोसळली. त्यात ४३ कामगार अडकले आहेत, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. (Earthquake hits Myanmar)

बीजिंगच्या भूकंपमापन संस्थेनुसार शुक्रवारी म्यानमारमधील झालेल्या शक्तीशाली भूकंपाचे धक्के चीनच्या नैऋत्य युनान प्रांतात जाणवले. शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर (सीईएनसी) ने ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त दिले आहे. तर सीईएनसी ने सोशल मिडियावर म्हटले आहे की युनानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake hits Myanmar)

युएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या सेंटर फॉर जिओसायन्सेसने प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितले आहे की भूकंपाचा केंद्रबिदू दहा किलोमीटर (६.२) खोल आहे. त्याचे केंद्र म्यानमारमध्ये आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाचे केंद्रस्थान सागाईंगच्या वायव्येस १६ किलोमीटर अंतरावर आणि १० किलोमीटर खोलीवर आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजून ५० शक्तीशाली भूकंप झाला.

बँकॉकलाही भूकंपाचे धक्के बसले आहेत. गगुनचुंबी इमारती असलेल्या या शहरात एक कोटी ७० लाख लोक राहतात. भूकंपामुळे इमारतींचे नुकसान झाले. शहरातील काही मेट्रो आणि रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. एक्स पोस्टनुसार थाई पंतप्रधान पेटोंगटार्न शिनवात्रा यांनी भूकंपानंतर तातडीची बैठक घेण्यासाठी फुकेतचा अधिकृत दौरा त्यांनी रद्द केला आहे. बैठकीनंतर थायलंडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

तीन कामगारांचा मृत्यू
एएफपीच्या वृत्तानुसार, भूकंपाच्या धक्क्याने बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली. यात किमान तीन कामगारांचा मृत्यू झाला, असे थायलंडचे उपपंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी सांगितले.

वेचायचाईंनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात किमान ८१ लोक अडकले आहेत.

हेही वाचा :

न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00