Home » Blog » २६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय

२६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय

फेर मतमोजणी, व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज

by प्रतिनिधी
0 comments
EVM file photo

मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या दोन पराभूत उमेदवारांचाही त्यामध्ये समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी तब्बल २३६ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर लोकसभेत ४८ पैकी ३१ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला ४९ जागा मिळवता आल्या. अवघ्या ५ महिन्यात झालेल्या या आमूलाग्र परिवर्तनामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याने त्यांनी आपल्या मनासारखा निकाल घडवून आणल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.

ईव्हीएमवरील मतदान बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात यासाठी काँग्रेस देशपातळीवर आंदोलन उभे करणार आहे. तर, राज्यात जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात त्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने मतमोजणीला कोणाला अक्षय बसल्यास एकूण झालेल्या मताच्या पाच टक्के मते पुन्हा मोजणी करावयाची व व्हीव्हीपॅटद्वारे त्याची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी उमेदवाराने एका मतदान केंद्रासाठी सरासरी ४७,२०० रूपये भरावे लागत आहेत. त्यांना संशय असलेल्या मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्राच्या ठिकाणी ते हे मोजणीचा आग्रह करू शकतात.यासाठी आतापर्यंत एकूण २६ पराभूत उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणी व पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये जामखेड कर्जत येथे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेल्या राम शिंदे व जोगेश्वरी मतदार संघातून पराभूत झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनिषा वायकर यांचा समावेश आहे.

फेरमतमोजणीसाठी सर्वाधिक १२ उमेदवार हे शरद पवार गटाचे आहेत. तर ६ ठाकरे गटाचे आहेत. काँग्रेस व बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३ उमेदवारांचा समावेश आहे.

फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेले उमेदवार असे :

शरद पवार गट :

अभिषेक कळमकर, (अहमदनगर शहर),
राणी लंके, (पारनेर)
प्राजक्त तनपुरे (राहुरी),
संदीप वर्पे (कोपरगाव),
सुनील भुसारा (विक्रमगड),
प्रशांत जगताप(हडपसर),
अशोक पवार (शिरूर),
सचिन दोडके (खडकवासला) राहुल कलाटे (चिंचवड),
चरण वाघमारे (तुमसर)
फहाद अहमद, (अणुशक्तीनगर)
राहुल मोटे,(धाराशिव)

ठाकरे गट :

केदार दिघे, (कोपरी पाचपाखाडी),
राजन विचारे( ठाणे शहर),
नरेश मनेरा (ओवळा माजीवाडा) दीपेश म्हात्रे (डोंबिवली)
एम. के. मडवी (ऐरोली)
राजन साळवी (राजापूर)

काँग्रेस :

बाळासाहेब थोरात, (संगमनेर ),
रमेश बागवे,(पुणे कॅम्प)
नसीम खान (चांदिवली),

बविआ :

हितेंद्र ठाकूर( वसई),
क्षितिज ठाकूर, (नालासोपारा) राजेश पाटील, (बोईसर)

भाजप :

राम शिंदे, (कर्जत-जामखेड ) व

शिवसेना शिंदे गट:

मनिषा वायकर ( जोगेश्वरी),

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00