छत्रपती राजाराम महाराज यांनी मेबॅक कार ऑर्डर देऊन बनवून घेतली होती. त्यामुळे या गाडीला करवीर संस्थानच्या ध्वजाचा केशरी रंग देण्यात आला आहे.
गाडीवर पुढच्या बाजूला करवीर संस्थानचे मानचिन्ह देखील आहे. त्याच्या बाजूने ‘छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर’ असे लिहिण्यात आले आहे
त्याच्याच वरच्या बाजूला शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानीमाता कोरण्यात आली आहे. गाडीच्या बॉनेटवर भगवा ध्वजही लावण्यात आला आहे.
गाडी १७ फूट लांब आणि ६ फूट रुंद असून गाडीत६ ते ७ जण आरामात बसू शकतात. तर ही गाडी पूर्णतः ऑटोमॅटिक असून गाडीचे स्पीडमीटर हे किलोमीटर ऐवजी मैल परिमाण दाखवते. गाडीला मेकॅनिकल ब्रेक्स असून त्याला वॅक्कुम असिस्टंस आहे
दरवर्षी कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात सर्वांसमोर छत्रपतींना घेऊन मेबॅकची शाही एन्ट्री होत असते. त्यामुळे कोल्हापूरकर नेहमीच या गाडीला पाहण्यासाठी उत्सुक असतात.
जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर देखील अशीच मेबॅक कार वापरत होता. त्यामुळे या गाडीला ‘हिटलरर्स रोल्स’ असेही म्हंटले
सर्व फोटो- अर्जुन टाकळकर