कोल्हापूर : प्रबोधन साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, प्रा डॉ जे बी शिंदे सर यांचे गुरुवारी १२ रोजी राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. ते जय भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव व सरस्वती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष होते.
कोल्हापूरमध्ये सुमारे अकरा वर्षे त्यांनी अत्यंत चिकाटीने प्रबोधन साहित्य संमेलन घेऊन एक परंपरा निर्माण केली. संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अशा बहुजन समाजातील महामानवांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. पुरोगामी विषयावर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली. त्यांनी वृत्तपत्र, साप्ताहिकामध्ये प्रबोधनपर अभ्यासपूर्वक लेख लिहिले. त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. साप्ताहिक चित्रलेखा मधील त्यांचे स्तंभ लिखाण विशेष गाजले. (Dr. J.B. Shinde passes away)
विक्रम हायस्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून काही काळ काम केले. कमला कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख आणि वसंतराव नाईक बी.एड. कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, भाऊ, बहीण, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि.१३) होणार आहे. बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शनिवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्ष बिंदू चौक येथे आहे. (Dr. J.B. Shinde passes away)