जमीर काझी : मुंबई : आखाती युद्धात आणखीन एका मुंबईकर खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . इराकजवळ बसरा परिसरातील अल-जुबैर पोर्टजवळ कार्गो लोडींग ऑपरेशन दरम्यान एमटी सेफसी विष्णू या जहाजावर झालेल्या ड्रोन हल्यात जहाजावरील चीफ इंजिनिअर देवआनंद प्रसाद सिंह (वय ५०) यांना प्राण गमवावे लागले आहेत .
देव आनंद हे मूळचे बिहारचे असून मुंबईतील कांदिवली परिसरात २०१९ पासून पत्नी कुमकुम आणि दोन मुलांसह राहत होते. या घटनेनंतर त्यांची पत्नी मुलांसह दिल्लीत माहेरी गेल्या असल्याचे सांगण्यात आले. (Mumbai Chief Engineer Devanand Dies in Gulf War)
दोन दिवसांपूर्वी पाण्याखालून झालेल्या ड्रोन हल्यात जहाजाचे मोठं नुकसान झाले होते . प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी रात्री पांढऱ्या रंगाची स्फोटकांनी भरलेली एक मानवविरहित बोट जहाजाच्या स्टारबोर्ट भागावर येऊन आदळली होती. त्यानंतर एक मोठा स्फोट होऊन जहाजाला आग लागली होती. दुर्दैवानं या आगीत होरपळून जहाजावरील चीफ इंजिनिअर देवआनंदन प्रसाद सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जहाजावरील सर्व क्रू मेंबर्सनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या टाकल्या. त्यानंतर जवळच असलेल्या एका टग बोटीने या सर्वांचे प्राण वाचवले. इकारच्या कोस्ट गार्डनं सर्व २७ क्रू मेंबर्सला नंतर सुरक्षित स्थळी हलवले. त्यामध्ये १५ भारतीय आणि १२ फिलीपीनी नागरिकांचा समावेश आहे. (Mumbai Chief Engineer Devanand Dies in Gulf War)
आखाती युद्धाची झळ अमेरिका-इस्रायल- विरूद्ध इराण या संघर्षातून निर्माण झालेल्या तणावाचा सागरी वाहतुकीवर सर्वात मोठा परिणाम झाला असून व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात भारतीय खलाशांचाही मृत्यू होण्याच्या घटना वाढला आहेत. भारताच्या बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या पर्शियन आखातात २८ भारतीय व्यापारी जहाजे आहेत. त्यावर एकूण ७७८ भारतीय खलाशी कार्यरत आहेत. आखाती देश हे भारताचे महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. दरवर्षी सुमारे २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार या प्रदेशाशी होत असतो. त्यामुळे या भागातील अस्थिरता आणि पुरवठा साखळीत निर्माण होणारे अडथळेही भारतासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी गोष्ट आहे.
या युद्धात यापूर्वी कांदिवलीतील महावीर नगर परिसरात राहणाऱ्या 32 वर्षाच्या दिक्षित अमृतलाल सोलंकी याचा मृत्यू झाला. क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या दीक्षितचा ओमानमधील मस्कतजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात बळी गेला आहे. (Mumbai Chief Engineer Devanand Dies in Gulf War)