नवी दिल्ली : हॉलिवूडच्या रंगारंग कार्यक्रमात जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली. ऑस्करच्या शर्यतीत ‘वन बॅटल, आफ्टर अनदर’ या हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले. जगभरातील चित्रपटप्रेमींना छातीत धडकी भरवणारा भयपट ‘सिनर्स’ चित्रपटातील मायकेब बी. जॉर्डनला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘हॅमनेट’साठी जेसी बकलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हॉलिवूडमधील झालेल्या पुस्कार सोहळ्यासाठी बडे स्टार उपस्थित होते. (‘One Battle After Another’)
कॉमेडियन आणि टेलिव्हिजन होस्ट कॉनन ओब्रायन याने सलग दुसऱ्यावर्षी बहारदार सुत्रसंचालन केले. माजी विजेते अॅड्रियन ब्रॉडी, मिकी मॅडिसन, किरन कल्किन आणि झो साल्दाना, ग्वेनेथ पॅल्ट्रो, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, क्रिस इव्हान्स, जेव्हियर बार्डेम, माया रुडोल्फ, डेमी मूर, कुमेल नानजियानी, अँनी हॅथवे, विल अर्नेट आणि पॉल मेस्कल भारताची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अकादमी सोहळ्यासाठी उपस्थित होती. अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर अलिकडेच वाढलेल्या तणावानंतर यावर्षी डॉल्बी थिएटरमध्ये होणाऱ्या या समारंभाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. (‘One Battle After Another’)
‘वन बॅटल आफ्टर अनदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्तम पटकथेसाठी ऑक्सर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला १३ नामांकने मिळाली. रायन कुगलर दिग्दर्शित सिनर्स चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि तांत्रिक श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाले. या भयपटाने चित्रपट उद्योगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सिनर्स ला १६ मानांकने मिळाली होती.
वन बॅटल ऑफ्टर अदर साठी कॅसँड्रा कुलुकुंडिसला सर्वोत्कृष्ट कास्टिंग पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकली ही ऑस्कर जिंकणारी आयर्लंडची पहिली महिला ठरली आहे. हॅमनेट चित्रपटातील अभिनयाबद्दल तिला पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार सेंटीमेंटल व्हॅल्यूला मिळाला. प्रियांका चोप्रा, जेवियन बार्डेम यांनी पुरस्कार प्रदान केला. सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार सिनर्सला मिळाला. ऑटम ड्युराल्ड अर्कापाव यांनी सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी ऑस्कर जिंकणारी पहिला महिला ठरली आहे. (‘One Battle After Another’)
चित्रपट -वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-पॉल थॉमस अँडरसन,वन बॅटल आफ्टर अनदर,
सर्वोत्कृष्ट अभिनेता-मायकल बी. जॉर्डन सिनर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– जेसी बकले,हॅमनेट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-शॉन पेनवन, वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-एमी मॅडिगन,वीपन्स
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा-रायन कूगलर,सिनर्स
सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा-पॉल थॉमस ,अँडरसन वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट-के पॉप डेमन हंटर्स
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट-सेंटिमेंटल व्हॅल्यू (नॉर्वे)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी-ऑटम ड्युराल्ड अर्कापा,सिनर्स
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स-अवतार: फायर अँड ॲश
(‘One Battle After Another’)