छत्रपती शिवाजी महाराजांच्या कसबा बावड्यातील बहुशस्त्रधारी  पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याची प्रतिकृती भेट देण्यात आली.

कसबा बावड्यातील भगवा चौकात कार्यक्रमासाठी  समितीने जोरदार तयारी केली होती.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यावर राहुल गांधी भारावून गेले. त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये पुतळ्याचा फोटो काढून घेतला.

छत्रपती शिवरायांच्या १६ व्या शतकातील समकालीन तैलचित्रांचा अभ्यास करून हा पुतळा तयार करण्यात आला आहे.  कमरेला शेलापटका, कट्यार आणि पाठीवर ढाल, उजव्या हातात दांडपट्टा, डाव्या हातात धोप आणि पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव अशा देखण्या पेहरावात हा पुतळा बनविला आहे.

यावेळी राहुल गांधी यांच्यासमवेत आ. सतेज पाटील,  डॉ. संजय डी. पाटील, खा.  शाहू महाराज, आ. विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.